Rules and Regulations
1. बुकिंगसाठी 50% रक्कम आवश्यक आहे.
2. बुकिंग जेवढे लोकांचे आहे तेवढी रक्कम भरावी लागेल. सभासद संख्या कमी झाल्यास केंद्र जबाबदार राहणार नाही.
3. पूर्ण रक्कम भरल्यानंतरच चेक इन करता येईल.
4. बुकिंग व्यतिरक्त कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला जाणार नाही. तसे आढळून आल्यास अतिरिक्त चार्ज आकारला जाईल.
5. कोणताही सभासद उशिरा आल्यास अथवा लवकर गेल्यास केंद्र जबाबदार नाही. त्या सभासदांस पॅकेजप्रमाणेच दर आकारला जाईल.
6. बुकिंग रद्द करण्यासाठी कमीतकमी १५ दिवस अगोदर कल्पना देणे आवश्यक आहे.
7. कमीतकमी एक दिवस अगोदर बुकिंग करणे अनिवार्य आहे.
8. शेती, पाळीव प्राणी, वृक्ष, रोपे, सरपटणारे प्राणी अशा अनेक गोष्टी येथे आढळून येतात.
9. ठरलेल्या मेनुप्रमाणेच नाष्टा, जेवण हे दिलेल्या वेळेतच करावे. वैयक्तिक ऑर्डर स्वीकारली जाणार नाही.
10. हे कृषी पर्यटन केंद्र आहे. हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट यासारख्या सुविधा मिळणार नाही. सेल्फ सर्व्हिस अपेक्षित.
11. येथे अनेक पर्यटक ग्रुप असू शकतात. आपणांस स्वतंत्र सेवा पुरवली जाणार नाही, याची कल्पना असावी.
12. येथे अनेक तांत्रिक अडचणी येऊ शकतात.
13. परिसर नीटनेटका ठेवण्यासाठी डस्टबीन ठेवलेल्या आहेत. कचरा हा डस्टबीनमध्येच टाकावा.
14. रूममध्ये ओले कपडे, अथवा कोणतेही पदार्थ नेऊ नये.
15. रुम अथवा बाथरूममध्ये कचरा ठेवू नये.
16. गरम पाणी २४ तास उपलब्ध असले तरी शक्यतो सकाळी ६ ते ९ या वेळेत गरम पाण्याचा वापर करावा.
17. वीज नसल्यास व इतर वेळेत गरम पाणी उपलब्ध नसल्यास केंद्र जबाबदार नाही.
18. स्विमिंगपूल, रेनडान्स, म्युझिक सिस्टिम, गार्डन, गेम्स सर्वांसाठी आहे. त्यामुळे यांचा मर्यादीत वापर होणे आवश्यक आहे.
19. पाण्याचा अपव्यय टाळावा.
20. धुम्रपान व मद्यपान करण्यास मनाई आहे.
21. गरज नसताना वीजेची उपकरणे चालू ठेवू नयेत.
22. लक्ष्मीबन हे शांतताप्रिय ठिकाण आहे याची जाणीव असावी. आरडाओरड करणे अथवा किंचाळणे असे कृत्य करू नये.
23. रिसॉर्टमध्ये कुठल्याही प्रकारचे वैयक्तिक कार्यक्रम करता येणार नाही. त्यासाठी वेगळे पॅकेज आहेत. उदा. वाढदिवस, बारसे, साखरपुडा, लग्न, इत्यादी.
24. स्पीकर गरजेनुसार रात्री 10 वा. पर्यंत कमी आवाजात वाजविता येईल. (शासकीय नियम)
25. डे पॅकेजमध्ये हॉल, चेंजिंग रूम चा वस्तू ठेवणे, कपडे बदलणे अथवा इतर कारणासाठी वापर करता येईल. रूम आवश्यक असल्यास अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल. ( उपलब्धतेनुसार)
26. लक्ष्मीबनमधील वास्तू, वस्तूंचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई घेतली जाईल.
27. स्टाफशी आदरपूर्वक व सौजन्याने वागावे. कोणत्याही कारणासाठी वाद घालू नये.
28. सर्व वास्तू, नियम व इतर गोष्टींची व्यवस्थित माहिती घेऊन बुकिंग करावी. बुकिंगनंतर अथवा प्रत्यक्ष ठिकाणी तक्रार अथवा वाद घालू नये.
Gallery












